News Flash

MPL Sports टीम इंडियाचा ‘किट स्पॉन्सर’, BCCI कडून अधिकृत घोषणा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून टीम इंडियात होणार बदल

बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडियाच्या नवीन किट स्पॉन्सरची अधिकृत घोषणा केली आहे. MPL (Mobile Premier League) आणि बीसीसीआय यांच्यात पुढील ३ वर्षांसाठी करार झाला आहे. नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ पर्यंत हा करार कायम राहणार आहे. टीम इंडियाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर आता नवीन लोगो दिसणार आहे.

याव्यतिरीक्त भारतीय महिला संघ आणि U-19 संघासाठीही हा करार लागू असणार आहे. लॉकडाउन काळात टीम इंडियाचा किट स्पॉन्सर असलेल्या Nike कंपनीने करार वाढवून घेणार नसल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर बीसीसीआयने नवीन स्पॉन्सरसाठी शोध सुरु केला होता. मध्यंतरीच्या काळात टीम इंडियाला किट स्पॉन्सर मिळत नसल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. परंतू अखेरीस बीसीसीआयने MPL सोबत करार करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. प्रत्येक सामन्यासाठी ६५ लाख आणि merchandising साठी वर्षाला ३ कोटी रुपये MPL बीसीसीआयला देणार आहे.

सध्या भारतीय खेळाडू युएईत आयपीएल स्पर्धा खेळत आहेत. १० नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना संपला की भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. २७ नोव्हेंबर पासून टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:53 pm

Web Title: bcci ropes in mpl sports as team indias official kit sponsor psd 91
Next Stories
1 “सूर्यकुमार, तुझी लाज वाटते…”; ‘त्या’ प्रकारानंतर क्रिकेटपटूवर जोरदार टीका
2 पूजेला हजेरी लावल्याने क्रिकेटपटूला जीवे मारण्याची धमकी
3 Ind vs Aus : विराटच्या अनुपस्थितीत रोहितला कसोटीत स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी !
Just Now!
X