भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) वितुष्ठ घेऊन पचतावलेले हरुन लॉरगट भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याबाबत चिंतेत असून याबाबत ते बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांच्याशी चर्चा करणार आहेत. दुबईमधील आयसीसीच्या मुख्यालयात सर्व देशांच्या मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट होणार असून यावेळी लॉरगट पटेल यांच्याशी या दौऱ्याबाबत चर्चा करतील.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन कसोटी, सात एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार होता. पण बीसीसीआयने नव्याने या कार्यक्रमाची आखणी करायला सुरुवात केली असून यामध्ये दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश केला आहे. जर दौऱ्यातीलोमने कमी झाले तर आर्थिक नुकसान होण्याची भिती दक्षिणोफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला सतावत आहे.
भारतीय क्रिकेट मंडळ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील सामने कमी करणार असल्याचे ऐकिवात आहे. याबाबत मी बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांच्याशी चर्चा करणार असून या दौऱ्याच्या कार्यक्रमाची आखणी उत्तम कशी करता येईल यावर मी चर्चेत भर देईन.
हरून लॉरगट, दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी