News Flash

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, हार्दिक पांड्याचं पुनरागमन

शिखर-भुवनेश्वरलाही संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२ मार्चपासून सुरु होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आलेली आहे. २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. १५ सदस्यीय संघात सुनिल जोशी यांच्या निवड समितीने, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांना संधी दिलेली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक टी-२० स्पर्धेत हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली होती. त्यातच रोहित शर्मा अजुनही दुखापतीमधून सावरला नसल्यामुळे शिखर धवनला आणखी एक संधी देण्यात आलेली आहे. या मालिकेसाठीही विराट कोहलीकडेच भारतीय संघाचं नेतृत्व असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी असा असेल भारताचा वन-डे संघ :

शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2020 3:23 pm

Web Title: bcci selection committee announced odi squad for south africa series hardik pandya returns psd 91
टॅग : Bcci,Hardik Pandya
Next Stories
1 T20 World Cup : स्पर्धा गाजवणारी शफाली फायनलमध्ये अपयशी
2 T20 World Cup Final : हेलीने महिला दिन गाजवला, माजी यष्टीरक्षकाचा विक्रम मोडला
3 T20 World Cup Final : एलिसा हेलीचा दाणपट्टा, भारतीय महिलांना चोपलं
Just Now!
X