विविध कंपन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने केलेल्या गुंतवणुकीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. मंडळाचे अंतरिम अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी याबाबत सांगितले की, सध्या धोनी व भारतीय संघातील अन्य सहकारी चॅम्पियन्स चषक स्पर्धेनिमित्त इंग्लंडमध्ये आहेत. मायदेशी परतल्यानंतर धोनी याची चौकशी केली जाणार आहे.
ऱ्हिती स्पोर्ट्स कंपनीमध्ये धोनीचे भांडवल असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक खेळाडूंनी त्याच्यावर कडाडून टीका केली होती. त्यामुळे धोनी याने केलेल्या गुंतवणुकीबाबत तसेच या कंपन्यांमध्ये असलेले हितसंबंध याबाबत त्याची चौकशी केली जाणार आहे. धोनीच्या चौकशीबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन तट पडले असल्याचे समजते. एक मात्र नक्की, की मंडळाने आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंना त्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती व त्यामध्ये आलेल्या रकमेचे स्त्रोत आदी माहिती कळविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.