News Flash

‘सचिन…. सचिन….’; आजच्याच दिवशी थांबला होता ‘हा’ जयघोष!

सचिनचं ते भावनिक भाषण पुन्हा ऐकाच...

‘सचिन…. सचिन….’; आजच्याच दिवशी थांबला होता ‘हा’ जयघोष!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने १६ नोव्हेंबर २०१३ ला क्रिकेटला अलविदा केले. १५ नोव्हेंबर १९८९ ते १६ नोव्हेंबर २०१७ अशी ही समृद्ध कारकीर्द. बरोबर २९ वर्षांपूर्वी सचिनने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि २०१३ साली आजच त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. याच आठवणींना ‘बीसीसीआय’ने उजाळा देत सचिनचे निवृत्तीचे भावनिक भाषण ट्विट केले आहे.

काल सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या पदार्पणाच्या काळचा फोटो ट्विट करत जुन्या आठवणी जागवल्या होत्या.

वयाच्या १६ व्या वर्षी सचिनने १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या सचिनने पहिल्या डावात फक्त १५ धावा काढल्या होत्या. या सामन्यात पाकिस्तानच्या वकार युनूसने सचिनला बाद केलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे वकार युनूसचाही तो पदार्पणाचाच सामना ठरला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ पेक्षा जास्त वर्षांच्या कारकिर्दीनंतर सचिनने अखेर निवृत्ती घेतली. योगायोगाची गोष्ट म्हणजे २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज सचिनने विंडीजविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. या कसोटीत सचिनने ७४ धावा केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2018 12:25 pm

Web Title: bcci shares sachin tendulkars last speech on the field of international cricket
टॅग : Bcci,Sachin Tendulkar
Next Stories
1 लैंगिक अत्याचार प्रकरण : आयपीएल अध्यक्षांच्या सहाय्यकाला निर्दोषत्व बहाल!
2 माझ्या यशात शास्त्रींचा वाटा मोलाचा!
3 ..आधी केळेची पाहिजे!
Just Now!
X