News Flash

बीसीसीआयच्या कार्यकारिणी बैठकीत चेन्नई व राजस्थानचे भवितव्य ठरणार

आयपीएलमधून निलंबित करण्यात आलेल्या दोन संघांचे भवितव्य

शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील या पहिल्या बैठकीत चेन्नई आणि राजस्थानला अभय मिळण्याची शक्यता आहे.

आयपीएलमधून निलंबित करण्यात आलेल्या दोन संघांचे भवितव्य, आयपीएल पुरस्कर्ते पेप्सीकोचा माघार घेण्याचा अर्ज आणि पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित करणे, हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रविवारी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचे विषय असणार आहेत. २०१३च्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाबाबत न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अहवालानुसार चेन्नई आणि राजस्थान या दोन संघांना दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील या पहिल्या बैठकीत चेन्नई आणि राजस्थानला अभय मिळण्याची शक्यता आहे. पेप्सीकोने आयपीएल पुरस्कर्ते म्हणून माघार घेण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे बीसीसीआय पुन्हा त्यांच्याशी वाटाघाटी करणार की नवे पुरस्कर्ते शोधणार, हे या बैठकीत ठरेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 4:16 am

Web Title: bcci take decision in meeting about rajasthan royals
Next Stories
1 भारताची ऑस्ट्रेलियावर मात; आज ब्रिटनशी अंतिम सामना
2 इंग्लंडचा विजय हुकला; कसोटी अनिर्णीत
3 दिल्लीतील प्रदर्शनीय सामन्यात सानिया, पेस व भूपतीचा सहभाग
Just Now!
X