News Flash

कर्णधार विराट कोहलीच्या नोकरीवर गदा येणार?

'ONGC' कंपनीच्या व्यवस्थापक पदाची नोकरी सोडण्याचे आदेश

विराट कोहली (संग्रहित छायाचित्र)

लोढा समिती विरुद्ध बीसीसीसीआय या गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या वादाचा आता भारतीय संघाच्या क्रिकेटपटूंना फटका बसण्याची चिन्ह आहेत. कारण बीसीसीआयने भारताचा कर्णधार विराट कोहलीला, त्याची ‘ONGC’ कंपनीतील मॅनेजर या पदाची नोकरी सोडण्याची विनंती केली आहे. इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्थान टाईम्सने यासंदर्भातलं वृत्त छापलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीसआयवर स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीने याआधीही सर्व क्रिकेटपटूंसाठी सरकारी किंवा खासगी नोकरी सोडण्याचे आदेश दिले होते. खेळामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक हितसंबंध आड येऊ नयेत याकरता सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला घालून दिलेल्या नियमांपैकी हा एक नियम आहे. विराट कोहली सध्या भारतीय संघाच्या कर्णधारपदासोबत, ‘ONGC’ या कंपनीच्या मॅनेजर पदावरही काम करतो. अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये कोहलीने ‘ONGC’ चं प्रतिनिधीत्व केलं आहे. कोहलीव्यतिरीक्त विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि इशांत शर्मा हे खेळाडू देखील ‘ONGC’ कंपनीत कामाला आहेत.

कोहलीव्यतिरीक्त बीसीसीआयने अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा अशा जवळपास १०० खेळाडूंना आपल्या सरकारी किंवा खासगी नोकरी सोडण्याबद्दल आदेश दिल्याचंही कळतंय. नवी दिल्लीत बीसीसीआयच्या आगामी विशेष सभेत या विषयावर चर्चा होणार असल्याचंही समजतंय. त्यामुळे आगामी काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनेक खेळाडूंना तोटा होण्याची शक्यता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.याआधीही सुनिल गावसकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडसारख्या महान क्रिकेटपटूंना आर्थिक हितसंबंधांच्या मुद्द्यावरुन आपल्या नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 11:53 am

Web Title: bcci urges virat kohli to leave his ongc manager job to avoid conflict of interest
टॅग : Bcci,Virat Kohli
Next Stories
1 Ind vs Sri Lanka 1st Test Day 4 Updates : गॉल कसोटीत भारताचा झेंडा, मालिकेत १-० ने आघाडी
2 महिला क्रिकेटपटूंना भरघोस प्रायोजकांची अपेक्षा
3 द्युतीला जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे निमंत्रण
Just Now!
X