प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाने अभ्यासात चांगलं प्राविण्य मिळवालं असं वाटतं असतं. यासाठी अगदी लहानपणापासूनच आई-वडिल आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे अगदी जातीने लक्ष देत असतात. या नादात अनेकदा आई-वडिल आपल्या मुलांना मारझोडही करतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. आपल्या लहान मुलीला शिकवताना एक आई, मुलीला आकडे नीट जमत नसल्यामुळे मारताना दिसत आहे.

या व्हिडीओवर अनेकांनी आपली हळहळ व्यक्त केली आहे. भारताचे क्रिकेटपटू शिखर धवन आणि रॉबिन उथप्पा यांनीही हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत, पालकांना आपल्या मुलांचा अभ्यास घेताना थोडा संयम दाखवण्याचं आव्हान केलं आहे.

अवश्य वाचा – जाणून घ्या किती शिकलेत तुमचे आवडते क्रिकेटवीर?

या व्हिडीओत मुलीची आई तिला १ ते ५ आकडे म्हणायला सांगताना दिसत आहे. मात्र प्रत्येक आकडे म्हणल्यानंतर या मुलीला काही अडचणींचा सामना करावा लागत होता. यावेळी आपल्या मुलीला सहानुभूती देऊन शांत करण्याऐवजी तिला मारत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. पालकांना संयम राखण्याचा संदेश देणाऱ्या शिखर धवनलाही एक मुलगा आहे. शिखरच्या मुलाचं नाव झोरावरं असून अनेक वेळा आपल्या मुलासोबतचे फोटो शिखरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.