22 September 2020

News Flash

सचिनला स्ट्राईक न दिल्यानेच यशस्वी ठरलो- सेहवाग

सेहवागने उलगडले फलंदाजीतील यशाचे रहस्य

सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग

मैदानावर मनमोकळेपणे फटकेबाजी करणारा वीरेंद्र सेहवाग मैदानाबाहेरदेखील त्याच्या मनमोकळ्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. एका कार्यक्रमात उपस्थितांसोबत बिनधास्त संवाद साधताना सेहवागने त्याच्या पॉवरप्लेमधील यशाचे रहस्य उलगडले. ‘सचिनला पॉवरप्लेमध्ये फार स्ट्राईक न दिल्यानेच यशस्वी ठरलो,’ असे सेहवागने म्हटले. ‘पहिल्या १५ षटकांमध्ये अधिकाधिक वेळ स्ट्राईक स्वत:कडेच ठेवण्याच्या विचारानेच मैदानावर उतरायचो,’ असे सेहवागने सांगितले.

‘१६-१७ वर्षांचा असताना मला अरुण कुमारसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी मिळाली. अरुण कुमार सलामीवीर होता आणि त्याच्याकडून मी खूप काही शिकलो. ज्यावेळी सौरव गांगुलीने मला भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करण्याची संधी दिली, तेव्हा अरुण कुमार पहिल्या १५ षटकांमध्ये गोलंदाजांवर कसा तुटून पडायचा, हे मला आठवले,’ अशी आठवण सेहवागने सांगितली. ‘पावरप्लेमध्ये यशस्वी व्हायचे असल्यास, जास्तीत जास्त चेंडूंचा सामना करायला हवा, असा सल्ला मला अरुण कुमारने दिला होता. मी हाच सल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये अंमलात आणला. त्यामुळे मी सचिन तेंडुलकरला पावरप्लेमध्ये स्ट्राईक देणे टाळायचो आणि त्यामुळेच मी यशस्वी झालो,’ असे सेहवागने सांगितले.

सचिन तेंडुलकरच्या नम्रपणाची वीरेंद्र सेहवागने भरभरुन कौतुक केले. ‘सचिन हा सर्वात नम्र क्रिकेटपटू आहे. त्याच्या वर्तणुकीतून नम्रता दिसून येते,’ असे सांगताना सेहवागने १४ वर्षांपूर्वींचा एक प्रसंगदेखील सांगितला. ‘आम्ही २००३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेत होतो. आम्ही एकदा बसमधून उतरत असताना आम्हाला एक अपंग व्यक्ती दिसली. तो अपंग माणूस आम्हाला भेटण्यासाठी तिथे उभा होता. फक्त सचिन त्या व्यक्तीपर्यंत गेला. सचिनने त्या व्यक्तीसोबत हस्तांदोलन केले आणि फोटोही काढला. सचिनशिवाय संघातील इतर कोणताही खेळाडू त्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेला नाही. सचिन ही जगातील सर्वात नम्र व्यक्ती आहे आणि तेच त्याच्या यशाचे रहस्य आहे,’ अशा शब्दांमध्ये सेहवागने सचिनची अगदी मुक्तकंठाने प्रशंसा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 12:11 pm

Web Title: became famous by not giving strike to sachin tendulkar says virender sehwag
Next Stories
1 पैसे नसल्यामुळे ‘हा’ क्रिकेटपटू लंगरमध्ये जेवायचा आणि गुरूद्वारात झोपायचा…
2 ढिश्यूम.. ढिश्यूम.. मनोरंजनातून!
3 भारताचे नेतृत्व राणीकडे
Just Now!
X