05 March 2021

News Flash

बेल्जियमचे विश्वचषक स्पर्धेतील स्थान निश्चित

लक्झेम्बर्ग संघाने बलाढय़ फ्रान्सला गोलशून्य बरोबरीत रोखण्याची किमया साधली.

रोमेलू लुकाकू

विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा

रोमेलू लुकाकूच्या गोलच्या बळावर बेल्जियमने ग्रीसला २-१ असे नामोहरम केले आणि २०१८ मध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. आगामी विश्वचषकासाठी पात्र ठरणारे बेल्जियम हे पहिले युरोपियन राष्ट्र ठरले आहे.

मँचेस्टर युनायटेडच्या लुकाकूने ७४ व्या मिनिटाला थॉमस मेयुनीयरच्या क्रॉसवर हेडरद्वारे गोल झळकावला आणि ह गटातून पात्रतेचा मान मिळवला. या सामन्यातील तिन्ही गोल हे दुसऱ्या सत्रात पाच मिनिटांमध्ये नोंदवले गेले. ७० व्या मिनिटाला जॅन व्हटरेघेनने बेल्जियमचे खाते उघडले. मग ७३ व्या मिनिटाला मध्यरक्षक झीकाने ग्रीसला बरोबरी साधून दिली.

ब्राझील, इराण, जपान, मेक्सिको आणि यजमान रशियानंतर बेल्जियम हा विश्वचषकामधील स्थान नक्की करणारा सहावा संघ ठरला आहे.

लक्झेम्बर्ग संघाने बलाढय़ फ्रान्सला गोलशून्य बरोबरीत रोखण्याची किमया साधली. तसेच अ‍ॅमस्टरडॅम येथे नेदरलँडस्ने बल्गेरिया संघाला ३-१ अशा फरकाने हरवले.

अर्जेटिना-चिली यांच्यात आज सामना

माँटेव्हिडीओ : पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण अमेरिका विभागातून पात्र होण्यासाठी अर्जेटिना आणि चिली यांच्यातील स्पर्धा तीव्रतेने सुरू आहे. मंगळवारी होणाऱ्या लढतीत लिओनेल मेस्सीचा अर्जेटिनाचा संघ दडपण निर्माण करीत आहे, तर व्हेनेझुएला संघाला हरवल्यामुळे चिलीचा आत्मविश्वास दुणावला ???.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 2:39 am

Web Title: belgium become first team to qualify for 2018 world cup
Next Stories
1 अनुप कुमार नाही तर ‘हा’ तरुण खेळाडू आहे या ५ विक्रमांचा मानकरी
2 American Open 2017: सानिया-रोहन बोपन्नाची आगेकूच, पेस पराभूत
3 ‘फुलराणी’ची घरवापसी! पुन्हा गोपीचंदसोबत सराव करणार
Just Now!
X