बेल्जियमचा आघाडीचा मध्यरक्षक केव्हिन डीब्रुएनेने तंदुरुस्तीच्या कारणास्तव नेशन्स लीग फुटबॉलमध्ये बुधवारी आइसलँडविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून माघार घेतली. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत बेल्जियमला १-२ने पराभव पत्करावा लागला. या लढतीत डीब्रुएननेला ७३ मिनिटांनंतर मैदानाबाहेर बोलावण्यात आले.

पेरूच्या दोन फुटबॉलपटूंना करोनाची लागण

साओ पावलो : पेरू फुटबॉल संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील बुधवारी होणाऱ्या ब्राझिलविरुद्धच्या पात्रता फेरीच्या सामन्याला त्यांना मुकावे लागणार असल्याची माहिती पेरू फुटबॉल महासंघाने दिली.रॉल रुडिज आणि अ‍ॅलेक्स व्हॅलेरा अशी या दोन खेळाडूंची नावे असून त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत.

चेक प्रजासत्ताकच्या प्रशिक्षकांना करोना

वॉशिंग्टन : चेक प्रजासत्ताक फुटबॉल संघाचे प्रशिक्षक जारोस्लॅव्ह सिलहॅवी यांना करोनाची बाधा झाली असल्याने बुधवारी नेशन्स लीग फुटबॉलमध्ये स्कॉटलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी ते अनुपस्थितीत असतील. सिलहॅवी यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक प्रशिक्षक जिरी चॅर्टी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावतील. त्याशिवाय संघातील एका खेळाडूलाही करोना झाली आहे.