News Flash

IPL२०२१मधून बाहेर पडल्यानंतर बेन स्टोक्सने भारतीय खेळपट्ट्यांना म्हटले ‘कचरा’!

दुखापतीमुळे स्टोक्स IPL२०२१मधून बाहेर

बेन स्टोक्स

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने आयपीएल २०२१मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय खेळपट्ट्यांबाबत एक ट्विट केले आहे. या खेळपट्ट्यांना स्टोक्सने कचरा म्हटले आहे. लीगचा पहिला टप्पा एम.ए. चिदंबरम स्टेडियम आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियम या दोन ठिकाणी खेळवण्यात येत आहे. दोन्ही ठिकाणच्या या खेळपट्ट्या पूर्णपणे भिन्न आहेत.

काय म्हणाला स्टोक्स?

आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमधून पाहिले, तर मुंबईच्या खेळपट्टीवर २००  धावांचे लक्ष्यही पूर्णपणे सुरक्षित नाही. तर चेन्नईची खेळपट्टी ही संथ असल्याचे समोर आले आहे. चेपॉकच्या खेळपट्टीवर १५० धावांचे लक्ष्य गाठतानाही संघाची अवस्था कठीण होत आहे. स्टोक्स आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, ”आशा आहे की, जसजसे आयपीएल पुढे जाईल, तशी खेळपट्टी खराब होऊ नये. कमीत कमी १६०-१७० धावा बरोबर आहेत, पण १३०-१४० धावा खेळपट्ट्यांना कचरा बनवत आहेत.”

 

राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू असलेल्या बेन स्टोक्सच्या डाव्या हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तो १२ आठवडे क्रिकेटपासून दूर असेल. आयपीएल सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली. या दुखापतीमुळे स्टोक्स संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे.

आयपीएलव्यतिरिक्त तो इंग्लंडच्या जूनमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांसाठी आणि जुलैदरम्यान श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड संघात सहभागी होणार नाही. या मालिकेनंतर त्यानंतर इंग्लंडला ८ ते ११ जुलै दरम्यान पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. बेन स्टोक्सशिवाय राजस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 3:28 pm

Web Title: ben stokes calls indian pitches trash after ipl 2021 exit adn 96
Next Stories
1 CSK vs RCB: चेन्नईच्या धोनी ब्रिगेडनं विराटसेनेचा विजयरथ रोखला
2 CSK vs RCB : वानखेडेवर आज भारताचे आजी-माजी कर्णधार भिडणार! आकडेवारीत धोनीब्रिगेड अव्वल!
3 IPL 2021 : “…म्हणून आम्ही हरतोय”, सलग चौथ्या पराभवानंतर कोलकाताचा कर्णधार अयॉन मॉर्गनची नाराजी!
Just Now!
X