विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनाविर पुरस्कारचा मानकरी ठरलेला अष्टपैलू बेन स्टोक्सला लवकरच ‘सर’ही उपाधी मिळण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे पंतप्रधान पदाचे उमेदवार बोरिस जॉनसन यांनी तशी घोषणा केली आहे. जर आम्ही सत्तेत आल्यास बेन स्टोक्सला नाइटहुड (सर) खिताब देऊन सन्मानित करू, असे बोरिस जॉनसन यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे.

‘द सन’ आणि ‘टॉक रेडियो’ यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रातमध्ये रॅपिड फायरमध्ये जॉनसन यांनी स्टोक्सला सर पदवी देऊ असे म्हटले आहे. रविवारी १४ जुलै रोजी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात चौकाराच्या आधारावर इंग्लंडला विश्वविजेतेपद मिळाले. या सामन्यात बेन स्टोक्सने फलंदाजी करताना ८२ धावांची नाबाद खेळी केली होती. इंग्लंडच्या विश्वविजेतेपदामध्ये बेन स्टोक्सचा सिंहाचा वाटा आहे. स्टोक्सने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सर्वोत्तम योगदान दिले.

ब्रिटनचे सध्याच्या पंतप्रधान थेरिसा मे यांनी सोमवारी इंग्लंड संघाची भेट घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘अंतिम सामन्यात हिम्मत, चरित्र, खेळ भावना, ड्रामा पहायला मिळाला. अंतिम सामन्यात इंग्लंडसोबत भाग्य होत.’

यजमान इंग्लंडने अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून विश्वविजेतेपद पटकावले. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. या सामन्यात बेन स्टोक्स याने सर्वोत्तम कामगिरी केली. केवळ मूळ सामन्यातच नव्हे तर सुपर ओव्हरमध्येही त्याने चांगली फलंदाजी केली आणि संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले. त्याला सामनावीर देखील घोषित करण्यात आले. बेन स्टोक्सच्या खेळीचे अनेकांनी कौतुक केले