इंग्लंडचा जिगरबाज डावखुरा फलंदाज बेन स्टोक्सने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात शतकी खेळी साकारून संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. कारकीर्दीतील अविस्मरणीय हे शतक असून, याची कोणत्याच खेळीशी तुलना होऊ शकत नाही, असे वर्णन स्टोक्सने केले आहे.

२८ वर्षीय स्टोक्सने २१९ चेंडूंत ११ चौकार आणि आठ षटकार लगावून नाबाद १३५ धावा फटकावल्या. त्यामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर एक गडी राखून मात केली आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विशेषत: ११व्या क्रमांकावरील फलंदाज जॅक लीचच्या साथीने त्याने हा पराक्रम केला. या खेळीविषयी स्टोक्स म्हणाला, ‘‘माझ्या कारकीर्दीतील अविस्मरणीय अशी ही खेळी होती. अखेरच्या क्षणापर्यंत लढायचे या हेतूनेच मी खेळत राहिलो. कारकीर्दीत पुन्हा कधीही मी अशी खेळी साकारेन की नाही, हे सांगू शकत नाही. परंतु आयुष्यातील दोन सर्वाधिक अभिमानास्पद क्षणांपैकी एक असा तो क्षण आणि ती खेळी होती.’’

ल्लगेल्या ५० वर्षांत मी पाहिलेली सर्वोत्तम खेळी. स्टोक्स तू महान आहेस. विश्वचषकापेक्षा तुझी ही खेळी कायम स्मरणात राहील.

– जेफ्री बॉयकॉट, माजी क्रिकेटपटू

* आजचा दिवस भारतीय क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरला. दुपारी सिंधू, रात्री स्टोक्स आणि मध्यरात्री रहाणे.. खेळाशिवाय हे जग आणि कसोटी सामन्यांशिवाय क्रिकेट अपूर्ण आहे.

– हर्षां भोगले, क्रिकेट समालोचक

* स्टोक्स, स्मिथ, रहाणे आणि आर्चर..चारही खेळाडू एकत्र..

राजस्थान रॉयल्सला ‘आयपीएल’चे विजेतेपद मिळवण्यापासून कोण रोखणार?

– आकाश चोप्रा, माजी क्रिकेटपटू

* नाही.. कदापि नाही.. बेन स्टोक्स तू असा पराक्रम नाही करू शकत.

– नासिर हुसैन, इंग्लंडचा माजी कर्णधार