News Flash

बेंगळूरुकडून यू मुंबाचा पराभव

यू मुंबाला ३०-२६ अशी धूळ चारली.

बेंगळूरुचा चढाईवीर पवन कुमार मुंबईच्या बचावपटूंना बाद करताना.

पवन शेरावतच्या झंझावाती चढायांच्या बळावर गतविजेत्या बेंगळूरु बुल्सने रविवारी प्रो कबड्डी लीगमध्ये यजमान यू मुंबाला ३०-२६ अशी धूळ चारली. याचप्रमाणे दबंग दिल्लीने हरयाणा स्टीलर्सचा ४१-२१ असा धुव्वा उडवत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात बेंगळूरुने मध्यंतराला १३-११ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही ही उत्कंठा टिकून राहिली. पवनने चढायांचे ११ गुण मिळवत बेंगळूरुच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला महेंदर सिंग आणि मोहित शेरावत यांनी छान साथ दिली.

त्याआधी, दिल्लीने चंद्रन रंजित (११ गुण) आणि नवीन कुमार (१० गुण) यांच्या चढायांच्या बळावर आपली विजयी घोडदौड कायम राखली. नवीनने तेलुगू टायटन्सविरुद्धच्या सामन्यानंतर दुसऱ्यांदा १० गुण मिळवण्याची किमया साधली. हरयाणाचा कर्णधार धरमराज चेरलाथनने स्पध्रेतील ४०० पकडींचा टप्पा पार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 12:20 am

Web Title: bengaluru bulls u mumba pro kabaddi 2019 mpg 94
Next Stories
1 रोहितशी मतभेदांबाबत विराटचे आज स्पष्टीकरण?
2 राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे धाबे दणाणले!
3 संघनिवडीच्या अस्थिर धोरणामुळे आत्मविश्वासाचे खच्चीकरण!
Just Now!
X