लाचलूचपत घेतल्याचे प्रकरण अंगलगट असल्याच्या कारणावरून फॉर्म्युला-वनचे संचालक बेर्निए एक्लेस्टोन यांनी पदत्याग केला आहे. प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत बेर्निए संचालक पदापासून दूर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
८३ वर्षीय बेर्निए एक्लेस्टोन यांच्यावर ४५ कोटी डॉलर्सची लाच घेतल्याचा आरोप आहे. यावरील सुनावणीच्या तारखा अजून निश्चित झाल्या नसल्या तरी, आरोप सिद्ध झाल्यास बेर्निए यांना तीन महिने ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. सुरु असलेल्या प्रकरणावरून चौकशीत पोलिसांना पूर्णपणे सहकार्य व्हावे या उद्देशाने बेर्निए पदावरून पायऊतार झाले आहेत. असे फॉर्म्यला वनने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच बेर्निए यांनी या आरोपांतून निर्दोष मुक्त होऊन पुन्हा पदावर रुजू होईन असा विश्वास व्यक्त असल्याचेही म्हटले आहे.