News Flash

सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळावी!

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे सूतोवाच

(संग्रहित छायाचित्र)

सट्टेबाजीला अधिकृत मान्यता दिल्यास गैरप्रकारांना आळा बसून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. तसेच सामनानिश्चितीबाबतच्या घटना रोखता येतील, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त करताना सट्टेबाजीला अधिकृत मान्यता मिळण्याबाबत सूतोवाच केले आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ठाकूर यांनी हे संकेत दिले आहेत. देशात सट्टेबाजीला अधिकृत मान्यता देण्यासाठी कार्यरत असलेल्या तसेच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य असलेल्या नीलेश शाह यांच्या सूचनेला उत्तर देताना ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे.

शाह म्हणाले की, ‘‘पैज लावणे हे भारतीयांच्या रक्तातच आहे. लास वेगास, मकाऊ तसेच नेपाळसारख्या ठिकाणी सट्टेबाजीला अधिकृत मान्यता आहे. त्यामुळेच जुगार किंवा सट्टेबाजीला अधिकृत मान्यता देण्यात यावी, अशी माझी सूचना आहे.’’ यावर प्रत्युत्तर देताना ठाकूर यांनी सांगितले की, ‘‘ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये सट्टेबाजीला अधिकृत मान्यता आहे. त्यामुळे देशाला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळतो. हा पैसा अन्य कामांसाठी तसेच खेळाच्या सुधारणेसाठी वापरता येऊ शकतो. सट्टेबाजीची पद्धत रूढ असते. सट्टेबाजीशी निगडित असलेल्यांना ही पद्धत योग्य ठरू शकेल. सट्टेबाजीमुळे सामनानिश्चितीसारखे प्रकार रोखता येऊ शकतील.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:23 am

Web Title: betting should be officially recognized anurag thakur abn 97
Next Stories
1 कोहलीच्या अनुपस्थितीत भारतावर अधिक दडपण -पाँटिंग
2 गोव्यात फुटबॉल कार्निव्हल
3 ओर्लाडो चॅलेंजर टेनिस स्पर्धा : भारताचा प्रज्ञेश उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X