आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन यंदा युएईत करण्यात आलं आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएईत खेळवली जाणार आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या स्पर्धेचं आयोजन परदेशात करण्यात आलंय. या स्पर्धेसाठी सर्व संघ युएईत दाखल झाले असून काही खेळाडूंसोबत त्यांची पत्नी व मुलही युएईत आली आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही आपली पत्नी रितीका आणि मुलगी समायरासोबत युएईत दाखल झालाय.
युएईत क्वारंटाइन झालेल्या रोहितने वर्कआऊटला सुरुवात केली असून, आपली पत्नी रितीकासोबत व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला.
रोहितने आपल्या या व्हिडीओला Strronger Together अशी कॅप्शन दिली आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने या व्हिडीओवर गमतीमध्ये आपल्या नेहमीच्या शैलीत…भाभी आपके साथ ओपन करने वाली है क्या भय्या?? असा प्रश्न विचारला आहे.
आयपीएलमध्ये चहल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु तर रोहित मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 6:51 pm