News Flash

सेलिब्रिटी कट्टा : आयनॉक्सला सामना पाहणार!

टीव्हीवर सामने पाहताना आनंदाच्या क्षणी दादा जोरजोरात उडय़ा मारायचा.

भाग्यश्री लिमये

मी सर्वसामान्य प्रेक्षकांसारखीच क्रिकेटची चाहती आहे. अजूनही क्रिकेटमधील बरेच नियम मला फारसे समजत नाहीत. पण क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटण्यात मी कुठेही मागे नसते. विश्वचषक स्पर्धा आली की आमचे घरही क्रिकेटमय होऊन जाते. माझा दादा क्रिकेटचा प्रचंड चाहता आहे. त्याच्यामुळेच आमच्या घरात वर्षभर क्रिकेटचे वातावरण असते. त्याच्यामुळे मला क्रिकेटचे सामने पाहण्याचा छंद लागला. लहानपणापासूनच मी हे अनुभवत आले आहे. टीव्हीवर सामने पाहताना आनंदाच्या क्षणी दादा जोरजोरात उडय़ा मारायचा. ते पाहून मीसुद्धा त्याच्याबरोबर उडय़ा मारत त्याच्या आनंदात सहभागी व्हायची. माझ्या भावामुळेच घरातील सर्वाना क्रिकेटची आवड निर्माण झाली आहे. आता सेटवर चित्रीकरण करत असताना आम्ही सामने पाहत असतो. अध्ये-मध्ये स्कोअर किती झाला, हे विचारत असतो. यंदाच्या विश्वचषकाची मनसोक्त मजा लुटण्याचे आम्ही ठरवले आहे. माझ्या शाळेतील मित्र-मैत्रिणींनी आयनॉक्समध्ये जाऊन क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्याचा बेत आखला आहे.

(शब्दांकन : भक्ती परब)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 3:29 am

Web Title: bhagyashree limaye cricket world cup 2019
Next Stories
1 विंडिजविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचा संघ ट्रोल, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
2 पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, नोंदवले नकोशे ७ विक्रम
3 Cricket World Cup 2019 : युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल ठरला षटकारांचा बादशहा
Just Now!
X