BCCI ने भारतीय क्रिकेटपटूंना २०१८ सालात दिल्या गेलेल्या मानधनाचे तपशील जाहीर केले आहेत. २०१८ वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यापासून आतापर्यंत खेळलेल्या खेळाडूंचं मानधन बीसीसीआयने चुकतं केलं आहे. यामध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भुवनेश्वर कुमारने ३ कोटी ७३ लाख ६ हजार ६३१ रुपये कमावत आपल्या संघातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे. याचसोबत बीसीसीआयने प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ३ महिन्यांचं २ कोटींपेक्षा जास्त मानधन दिलं आहे.

जाणून घेऊयात भारतीय खेळाडूंचं मानधन –

कर्णधार विराट कोहली :
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ६५ लाख ६ हजार ८०८ रुपये
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वन-डे मालिका – ३० लाख ७० हजार ४५६ रुपये
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)

प्रशिक्षक रवी शास्त्री :
१८-७-२०१८ ते १७-१०-२०१८ या काळातील प्रशिक्षणाचं आगाऊ मानधन – २ कोटी ५ लाख २ हजार १९८ रुपये

रोहित शर्मा :
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ५६ लाख ९६ हजार ८०८ रुपये
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वन-डे मालिका – ३० लाख ७० हजार ४५५ रुपये
श्रीलंकेतील निदहास टी-२० मालिका – २५ लाख १३ हजार ४४२ रुपये
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)

शिखर धवन :
जानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी १२ लाख २३ हजार ४९३ रुपये
श्रीलंकेचा भारत दौरा – २७ लाख
ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी ४१ लाख ७५ हजार

रविचंद्रन आश्विन :
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ५२ लाख ७० हजार ७२५ रुपये
जानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – ९२ लाख ३७ हजार ३२९ रुपये
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)
ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी १ लाख २५ हजार

भुवनेश्वर कुमार :
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ५६ लाख ८३ हजार ८४८ रुपये
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वन-डे मालिका – २७ लाख १४ हजार ५६ रुपये
जानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी १८ लाख ६ हजार २७ रुपये
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)
ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी ४१ लाख ७५ हजार

कुलदीप यादव :
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वन-डे मालिका – २५ लाख ५ हजार ४५२ रुपये

जसप्रीत बुमराह :
जानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी १३ लाख ४८ हजार ५७३ रुपये
ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – ६० लाख ७६ हजार रुपये

चेतेश्वर पुजारा :
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ६० लाख ८० हजार ७२५ रुपये
ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – ९२ लाख ३७ हजार ३२९ रुपये
जानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – १ कोटी १ लाख २५ हजार

इशांत शर्मा :
जानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – ५५ लाख ४२ हजार ३९७ रुपये
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानाबद्दल आयसीसीच्या बक्षिसातली रक्कम – २९ लाख २७ हजार ७०० (करप्राप्त)
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ४८ लाख ४४ हजार ६४४ रुपये

हार्दिक पांड्या :
जानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – ५० लाख ५९ हजार ७२६ रुपये
ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – ६० लाख ७५ हजार रुपये

युझवेंद्र चहल :
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वन-डे मालिका – २५ लाख ५ हजार ४५२ रुपये
जानेवारी ते मार्च २०१८ या काळातली ९० % Retainership Fee – ५३ लाख ४२ हजार ६७२ रुपये
ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या काळातली ९० % Retainership Fee – ६० लाख ७५ हजार रुपये

वृद्धीमान साहा :
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ४४ लाख ३४ हजार ८०५ रुपये

पार्थिव पटेल :
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी मालिका – ४३ लाख, ९२ हजार ६४१ रुपये