X

भुवनेश्वर कुमार क्लिनबोल्ड, खास पाहुण्यासोबत डिनर डेटवर!

भुवनेश्वर कुमार डिनरडेटवर

गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना कोड्यात टाकलं होतं. आपल्या फेसबूक पेजवर भुवनेश्वरने एका व्यक्तीसोबतचा आपला क्रॉप केलेला फोटो टाकला होता. या फोटोमुळे टीम इंडियाचा भुवी कोणत्या व्यक्तीसोबत डिनर डेटवर गेलाय, याची सर्वांमध्येच उत्सुकता होती. अनेकांनी भुवनेश्वर एखाद्या अभिनेत्रीसोबत डेटवर गेल्याचा अंदाज बांधला. अखेर भुवनेश्वरनेच या रहस्यावरचा पडदा उघडला आहे.

भुवनेश्वर कुमार ‘बेटर हाफ’ नुपूर नागरसोबत एका रेस्तराँमध्ये जेवायला गेला होता. याविषयी भुवनेश्वरने अधिक कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला. त्यामुळे सध्याच्या घडीला सोशल मीडियावर भुवनेश्वर कुमारचे चाहते त्याच्या रिलेशनशीपबद्दल अंदाज बांधत आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकलेल्या भुवनेश्वर कुमारच्या फोटोलाही नेटिझन्सही आपली पसंती दर्शवली.

Here’s the better half of the picture @nupurnagar

A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi) on

कसोटी संघात जागा मिळवायला अपयशी ठरलेला भुवनेश्वर कुमार भारताच्या वन-डे संघाचा अविभाज्य भाग आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत भुवनेश्वर कुमारने चांगली कामगिरी केली होती. आता भुवनेश्वर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेतही खेळणार आहे.

  • Tags: bhuvaneshwar-kumar,
  • Outbrain