महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धच्या दोन चारदिवसीय सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाची मंगळवारी घोषणा करण्यात आली असून, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि झहीर खान यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात गंभीर आणि झहीरला भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आले होते. याचप्रमाणे मार्च महिन्यात सेहवाग भारताकडून अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी त्यांना ही संधी देण्यात आली आहे. २००६मध्ये भारताकडून अखेरचा कसोटी सामना खेळलेल्या ३२ वर्षीय मोहम्मद कैफलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारत ‘अ’ संघातील मुरली विजय, सुरेश रैना, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, शिखर धवन आणि वृद्धिमान साहा यांना या संघात स्थान देण्यात आलेले नाही. कारण हे खेळाडू या कालावधीत चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळणार आहेत.
इंग्लंडमध्ये झालेली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या तिरंगी स्पध्रेसाठी भारतीय संघात स्थान मिळवू न शकलेल्या युवराज सिंगला विंडीज ‘अ’ संघाविरुद्धच्या एकदिवसीय लढतीसाठी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. स्थानिक क्रिकेट हंगामाचा प्रारंभ एन. के. पी. साळवे चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी इंडिया ब्ल्यू संघाचे कर्णधारपद युवराजकडेच देण्यात आले आहे. याचप्रमाणे इरफान पठाण इंडिया रेड संघाचे नेतृत्व करणार आहे. या स्पध्रेत एकदिवसीय रणजी विजेता दिल्लीचा संघ तिसरा संघ असेल.

साळवे चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी संघ
इंडिया रेड संघ : इरफान पठाण (कर्णधार), रॉबिन उथप्पा, अभिनव मुकुंद, सौरभ तिवारी, गुरकिराट मान, केदार जाधव, समित पटेल (यष्टीरक्षक), युसूफ पठाण, शाहबाझ नदीम, अभिमन्यू मिथुन, उमेश यादव, सूरज यादव.
इंडिया ब्ल्यू संघ : युवराज सिंग (कर्णधार), अक्षत रेड्डी, नमन ओझा (यष्टीरक्षक), मनदीप सिंग, अंकित बावणे, अभिषेक नायर, मनीष पांडे, पीयूष चावला, अंकित रजपूत, विनय कुमार, भुवनेश्वर कुमार, इरेश सक्सेना.

दुसऱ्या आणि तिसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघ :
चेतेश्वर पुजारा (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, शिल्डॉन जॅक्सन, अभिषेक नायर, पारस डोग्रा, उदय कौल (यष्टीरक्षक), परवेझ रसूल, भार्गव भट, धवल कुलकर्णी, झहीर खान, ईश्वर चंद पांडे, मोहम्मद शामी आणि मोहम्मद कैफ.

वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी संघ :
तीन एकदिवसीय आणि एक ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारत ‘अ’ संघ : युवराज सिंग (कर्णधार), उन्मुक्त चंद, रॉबिन उथप्पा, बाबा अपराजित, केदार जाधव, नमन ओझा (यष्टीरक्षक), युसूफ पठाण, इरफान पठाण, जयदेव उनाडकट, प्रवीण कुमार, सुमित नरवाल, शाहबाझ नदीम, मनदीप सिंग आणि राहुल शर्मा.

पहिल्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघ :
चेतेश्वर पुजारा (कर्णधार), जिवनज्योत सिंग, के. एल. राहुल, मनप्रीत जुनेजा, रजत पलीवाल, हर्शद खडिवाले, परवेझ रसूल, भार्गव भट, इश्वर चंद पांडे, मोहम्मद शामी, अशोक दिंडा, रोहित मोटवानी (यष्टीरक्षक), धवल कुलकर्णी आणि पारस डोग्रा.