अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत अश्विनने आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवलं. अश्विनने दुसऱ्या डावांत कसोटीमध्ये ४०० बळींचा टप्पा गाठला. ४०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा अश्विन जगातला १७वा तर भारताचा चौथा गोलंदाज ठरला. त्यानंतर अश्विनने आपल्या आणि संघाच्या यशामागचं रहस्य सांगितलं.

Ind vs Eng Video: हार्दिक पांड्याने घेतला भन्नाट झेल

बायो-बबलमध्ये वास्तव्यास असताना विलगीकरणाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असते. त्यामुळे अनेक खेळाडूंनी याविषयी तक्रार केल्याचेही आतापर्यंत निदर्शनास आले आहे. पण अश्विनने मात्र या वातावरणामुळे संघातील खेळाडू एकमेकांचे अधिक चांगले मित्र झाल्याचे त्यांच्यातील एकजूटता वाढली आहे, असे सांगितले.

ICC Test Rankings: रोहित शर्माची ‘टॉप १०’मध्ये धडक

‘‘बायो-बबलमध्ये कुटुंबीयांपासून दूर राहणे कोणत्याही खेळाडूसाठी आव्हानात्मक असते. पण असे असले तरी आम्हा खेळाडूंना अशा वातावरणात एकमेकांसह अधिक वेळ घालवण्याची संधी मिळते. मैदानावर सराव करण्याव्यतिरिक्त हॉटेलमध्येही आम्ही अनेकदा एकत्रच असतो. त्यामुळे बाय-बबलच्या नियमांमुळे ड्रेसिंग रूममधील वातावरणात प्रफुल्लित राहायला मदत होते आणि त्याचे सकारात्मक परिणाम संघाच्या कामगिरीवर दिसत आहेत,’’ असं अश्विनने सांगितलं.

IND vs ENG: कुंबळेचा विक्रम मोडणार का? अश्विन म्हणतो…

“क्रिकेटपटू आणि व्यक्ती म्हणून माझ्यात आवश्यक त्या सुधारणा मी करतो आहे. माझ्या कामगिरीत अपेक्षित सुधारणा होत असल्याने मी खूप आनंदी आहे. मी कसोटी आणि खेळाचा आनंद घेत आहे. तसेच माझ्या मते गेल्या १५ वर्षांत माझी आताची कामगिरी सर्वोत्तम होत आहे. मला सध्या अशाच प्रकारचा खेळ खेळणं सुरू ठेवायचे आहे. कोणताही विक्रम किंवा पराक्रम करण्याबद्दल मी फारसा विचार करत नाहीये”, असंही अश्विनने स्पष्ट केलं.