News Flash

विराट नाही, रहाणेनंच कसोटी संघाचं नेतृत्व करावं – बिशन सिंग बेदी

विराट कोहलीला फक्त फंलदाज म्हणून खेळवायला हवं...

ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला समजला जाणाऱ्या गाबाच्या मैदानावर भारतीय संघानं विजयी पताका फडकवली. १९ जानेवारी २०२१ रोजी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाली भारतीय संघानं कांगारुचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिका खिशात घातली. मालिकेपूर्वी अनेक दिग्गजांनी भारतीय संघाच्या माणहानीकारक पराभवाचं भाकित केलं होतं. त्या सर्व टीकाकारांना हे एक खणखणीत उत्तर आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेनं यशस्वीरित्या भारतीय संघाचं नेतृत्व केलं. पुन्हा एकदा भारतीय संघाच्या नेतृत्वाबाबात चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणेला कौल दिला आहे.

बिशन सिंग बेदी यांनी इंडियन एक्स्प्रेसला लिहिलेल्या आपल्या लेखात अजिंक्य रहाणे आणि संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. आपल्या लेखात बेदी म्हणतात की, ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य रहाणेला जवळून पाहिलं आहे. कुशल कर्णधाराची सर्वात मोठी बाब म्हणजे, तो आपल्या गोलंदाजाचा कसा वापर करतो हे होय. याबाबतीत मी रहाणेचा मोठा चाहता झालो आहे. ‘

आणखी वाचा- अजिंक्यला कांगारुचा केक कापण्यास सांगितलं मात्र…; ही बातमी वाचून तुम्हालाही वाटेल रहाणेचा अभिमान

‘तीन कसोटी सामने एखाद्या कर्णधाराचं निरिक्षण करण्यास पुरेशा आहेत. या कसोटी मालिकेत त्यानं केलेल्या गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षणाची केलेली योग्य प्लेसमेंट यावरुनच त्याचं कुशल नेतृत्व दिसून येतं. रहाणेच्या चुका शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, मात्र त्यानं आखलेल्या सर्व योजना व्यवस्थित आढळल्या. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात मला कोणतीही उणीव जाणवली नाही,’ असे बेदी म्हणाले.

आणखी वाचा- IND vs AUS: ‘जेवढं यश भारतीय संघाचं तितकचं’…इंझमाम उल हक म्हणाला…

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाज आधिक प्रभावी म्हणून समोर आल्याचं मला वाटतेय, असं माजी भारतीय कर्णधार बिशन सिंग बेदी आपल्या लेखात म्हणालेत. ते पुढे म्हणाले की, ‘रहाणेचं नेतृत्व पाहून मज्जा आली. अशा परिस्थितीत भारतीय कसोटी संघाच्या नेतृतासाठी माझी पसंती अजिंक्य रहाणेलाचं असेल. पण भारतीय संघाचा कर्णधार कोण असावा हे मी ठरवू शकत नाही, ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळनं निर्णय घ्या. विराट कोहलीला एक दिग्गज फलंदाज म्हणून खेळवणार? की साधारण कर्णधार म्हणून ? हा निर्णय क्रिकेट मंडळाचा आहे.’

नटराजनच्या स्वागताला बग्गी; सेहवागने शेअर केलेला Video बघाच

अजिंक्य रहाणेला कसोटी संघाचं कर्णधार करायला हवं. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी नेतृत्व द्यावं, असं मला वाटतेय. कदाचीत विराट कोहली अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी नेतृत्व ऑफर करु शकतो. जर असं झालं तर भारतीय क्रिकेटसाठी हा निर्णय चांगला असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 12:59 pm

Web Title: bishen singh bedi admires ajinkya rahane says he remind me tiger pataudi hope virat kohli handed test captaincy to him in england series nck 90
Next Stories
1 सिडनी कसोटीनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला होता, म्हणाले…; हनुमा विहारीचा खुलासा
2 राम मंदिरासाठी गंभीरने दिली एक कोटी रुपयांची देणगी
3 IND vs AUS: ‘जेवढं यश भारतीय संघाचं तितकचं’…इंझमाम उल हक म्हणाला…
Just Now!
X