News Flash

बिशप, फाल्कनची विजयी घोडदौड

बिशप क्लब व फाल्कन क्लब यांनी व्होबा चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली. सेंट व्हिन्सेंट प्रशाला व रेंजहिल्स मैदान येथे व्हिन्सेंट ओल्ड बॉईज

| April 3, 2013 03:04 am

बिशप क्लब व फाल्कन क्लब यांनी व्होबा चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली. सेंट व्हिन्सेंट प्रशाला व रेंजहिल्स मैदान येथे व्हिन्सेंट ओल्ड बॉईज असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. बिशप संघाने डेक्कन क्लब ‘अ’ संघावर १-० अशी मात केली. त्यांचा हा एकमेव गोल अ‍ॅलिस्टर फ्रेझी याने केला. फाल्कन संघाने गोल्डन फिदर्स संघाचा २-० असा पराभव केला. विजयी संघाकडून अतुल कुलकर्णी व श्रीजित पुष्पाकरण यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. पुणे क्लब ‘क’ संघाने आव्हान राखताना घोरपडी तामिळ युनायटेड संघावर ३-० असा सहज विजय मिळविला. पुणे क्लबचे हे गोल हर्षद लुणावत, ऋषभ ढेरे व धीरजकुमार यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 3:04 am

Web Title: bishop and falcon wins
टॅग : Sports
Next Stories
1 अखेरच्या षटकांसाठी सज्ज -द्रविड
2 एकच संघटना असावी ही तर शरीरसौष्ठवपटूंची इच्छा!
3 महाराष्ट्र खो-खो प्रीमियर लीगचा थरार ११ एप्रिलपासून
Just Now!
X