News Flash

BLOG: पंजाब दा बब्बर शेर..

वयाच्या ३५ व्या वर्षी आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारणं म्हणजे 'इट्स सिम्पली ग्रेट'

भारतीय संघात पुनरागमनासाठीची तुझी धडपड आणि स्थानिक पातळीवर गाळलेला घाम याचं कटकच्या वनडेत सोनं झालं

अँड द युवी इज बॅक…तोच आत्मविश्वास..तोच रांगडेपणा..डीप मिड विकेटवर बॅकफूटवरून उचलेला सिक्सर… आणि १४ वी खणखणीत सेंच्युरी…ओय बल्ले बल्ले.. पंजाबी पुत्तरने कर दिखाया.. युवराज देशातील युवांसाठी रोल मॉडेल बनलायस.. YouWeCan या फाऊन्डेशनची सुरूवात तू केलीस खरी पण मैदानातील दीडशतकी खेळीच्या जोरावर तू खरंच ते साध्य करून दाखवलंस… वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ द सीरिजचा मानकरी ठरलेला खेळाडू कॅन्सरशी दोन हात करतो काय..त्यावर मात करून पुन्हा मैदानात सरावाला उतरतो काय…रणजीमध्ये द्विशतकी खेळी साकारून पुन्हा संघात पदार्पण..रिअली इट्स वेरी डीफिकल्ट जॉब मॅन.. पण या ‘जगात काहीच अशक्य नाही’, याचा तू प्रत्यय दिलास. यासाठी खरंतर तुझं कौतुक करावं तितकं कमीच..वर्ल्डकपनंतर कॅन्सरवर उपचार करताना तुझ्या शारिरीक बदल झाले..खरं सांगतो तुला पाहून माझ्यासारख्या अनेकांना धक्का आणि तितकंच मनात चर्रर झालं असेल. टक्कल आणि पुढे आलेलं पोट..किती कष्ट घ्यावे लागले असतील तुला याची कल्पना करणं देखील कठीण..

वयाच्या ३५ व्या वर्षी आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारणं म्हणजे ‘इट्स सिम्पली ग्रेट’…भारतीय संघात पुनरागमनासाठीची तुझी धडपड आणि स्थानिक पातळीवर गाळलेला घाम याचं कटकच्या वनडेत सोनं झालं…सेंच्युरी पूर्ण केल्यानंतर तुझे पाणावलेल्या डोळ्यांनी तुझ्या मेहनतीची, लढाईची, जिद्दीची प्रचिती दिली. २००३ सालापासून खेळतोयस आणि २०१७ उजाडलं..मध्ये बराच काळ राष्ट्रीय संघापासून दूर होतास म्हणा..पण जेवढा खेळलास तो पूर्ण बेभान होऊन…मधल्या फळीची जबाबदारी मोठ्या हिंमतीने सांभाळून..दबावाच्या परिस्थितीमध्ये खेळपट्टीवर ठाण मांडून प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्यास..कॅप्टनशीपची हाव किंवा तशी इच्छा देखील कधीच व्यक्त केली नाहीस…कॅप्टनशीपच्या कुवतीबाबत अजिबात शंका नाही पण तू त्यासाठी कधीच खेळला नाहीस आणि खेळतही नाहीस..तू तुझ्यातील क्रिकेटच्या वेडापायी खेळतोस…क्रिकेट तुझ्या नसानसांत आहे..अॅच्युली क्रिकेट हाच तुझा प्राणवायू आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये…बाकी आता संसाराला देखील लागला आहेस..हेजल किच वहिनी लकी ठरल्यात..सुनेचा पायगुण चांगला असल्याचं सासूबाई म्हणाल्या असतील कदाचित, असो. जोक्स अपार्ट. पण तुला वैयक्तिक आयुष्यातील आणि क्रिकेटमध्येही नव्या इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा…लक्षात ठेव तू संघातील बब्बर शेर आहेस.. कटकमध्ये पूर्वीचा युवी आम्हाला पाहायला मिळाला. छाती बाहेर काढून मोठ्या आत्मविश्वासाने विकेटवर उभा राहणारा आणि त्याच बिनधास्त स्टाईलने फलंदाजी करणारा…और इस लडके को सारा जहाँ याद रखेगा.. यू जस्ट प्ले फ्रॉम द फ्रंट

 

– मोरेश्वर येरम
moreshwar.yeram@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2017 12:11 pm

Web Title: blog on yuvraj singh inspiring journey fight cancer celebrating best innings against england 2nd one day
Next Stories
1 सायना, जयराम उपांत्यपूर्व फेरीत
2 रिझवी शाळेच्या सोहमचा वयचोरीचा प्रताप
3 रणजीविजेत्या गुजरातचा शेष भारताशी सामना
Just Now!
X