News Flash

सानिया-मार्टिना जोडीची विजयी कूच

अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने ६८ मिनिटांत ६-३, ७-५ असा सोपा विजय मिळवला.

| March 13, 2016 05:56 am

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने बीएनपी पॅरिबास खुल्या टेनिस स्पध्रेत ऑस्ट्रेलियाच्या कॅसी डेलाक्यूआ आणि समांथा स्तोसूरचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने ६८ मिनिटांत  ६-३, ७-५ असा सोपा विजय मिळवला. पुढील स्पध्रेत त्यांच्यासमोर स्थानिक खेळाडू व्हॅनिआ किंग आणि तिची रशियाची जोडीदार अ‍ॅला क्रुडीव्हत्सेव्हाचे आव्हान असेल.

पुरुष गटात रोहन बोपन्ना आणि त्याचा रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मर्गिआ यांना फेलिसिआनो लोपेझ आणि मार्क लोपेझ या  जोडीचा सामना करावा लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 5:56 am

Web Title: bnp paribas open sania mirza martina hingis bounce back with a win at indian wells
टॅग : Sania Mirza
Next Stories
1 कॅरम : संतोष चव्हाणचा दमदार विजय
2 भारत पेट्रोलियम उपांत्यपूर्व फेरीत
3 VIDEO: …हे खेळाडू ठरु शकतात संघासाठी तारणहार
Just Now!
X