गेल्या दोन-तीन महिन्यात करोनाच्या तडाख्यामुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. परिणामी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे चित्र आहे. सर्व क्षेत्रातील सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटपटू हे यात आघाडीवर आहेत. नुकताच समालोचक आकाश चोप्रा याने त्याच्या यू-ट्युब चॅनलच्या माध्यमातून अभिनेता सुनील शेट्टी याच्याशी संवाद साधला. या वेळी सुनील शेट्टी आणि आकाश चोप्रा यांनी टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा १४ खेळाडूंचा संघ कसा असावा याबाबत चर्चा केली.

पैलवान सुरेश रैनाचा भन्नाट फोटो पाहिलात का?

सुनील शेट्टीने टी २० विश्वचषकासाठी सलामीवीर म्हणून रोहित शर्मासोबत लोकेश राहुलला संघात स्थान दिले. शिखर धवनची टी २० तील कामगिरी चांगली आहे, पण सुनील शेट्टीने मात्र राहुलला पसंती दर्शवली. तिसऱ्या स्थानी त्यानी विराट कोहलीला संघात समाविष्ट केले. कर्णधार विराट आणि दोन सलामीवीर यांचे संघातील स्थान १५० टक्के अढळ आहे, असे सुनील शेट्टी बोलता-बोलता म्हणाला. गेले अनेक महिने भारतीय क्रिकेटचे संघ व्यवस्थापन शोधात असलेल्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी त्याने मुंबईकर श्रेयस अय्यरला संघात स्थान दिले. पाचव्या आणि महत्त्वाच्या जागेसाठी सुनील शेट्टीने यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीची निवड केली. ऋषभ पंतला त्याच्या शारीरिक तंदुरूस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही सुनील शेट्टीने स्पष्ट केले.

आफ्रिदीने निवडला ‘वर्ल्ड कप स्पेशल’ संघ; सचिनऐवजी ‘या’ भारतीयाला स्थान

मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडूंच्या पर्यायासाठी त्याने हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांच्यासमवेत चर्चेत नसलेला खेळाडू विजय शंकर याचेही नावे सुचवले. तर गोलंदाजीत त्याने कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकीपटूंची निवड केली आहे. तर वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांना सुनील शेट्टीने पसंती दर्शवली आहे.