14 October 2019

News Flash

राष्ट्रकुलमध्ये बोल्ट प्रेक्षकाच्या भूमिकेत

जमैकाचा २८ वर्षीय विश्वविजेता योहान ब्लेकला २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुखापतीमुळे भाग घेता आला नव्हता.

‘वेगवान शर्यतींचा सम्राट’ म्हणून ओळखला जाणारा उसेन बोल्ट हा गोल्ड कोस्ट येथे पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला उपस्थित राहणार आहे. मात्र प्रेक्षक म्हणूनच त्याचा सहभाग असेल.

जमैकाचा २८ वर्षीय विश्वविजेता योहान ब्लेकला २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुखापतीमुळे भाग घेता आला नव्हता. आगामी स्पध्रेविषयी माहिती देताना ब्लेक म्हणाला, ‘‘या स्पर्धेतील १०० मीटर धावण्याच्या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी तो येणार आहे. बोल्टचा वारसा पुढे नेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. मी अद्याप राष्ट्रकुल पदक मिळवलेले नाही.’’

First Published on March 20, 2018 2:35 am

Web Title: bolt will play audience role in commonwealth game