अहमदाबाद : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने वैयक्तिक कारणास्तव गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. बुमराच्या जागी कोणत्याही खेळाडूचा समावेश करण्यात येणार नाही, ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे.
भारतीय संघाच्या खेळाचा ताण व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत बुमराला १२ मार्चपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांमधून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी तो भारतीय संघात नसेल. संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) प्रारंभ होण्याआधीपासून बुमरा जैव-सुरक्षित वातावरणात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने ११ बळी घेतले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2021 2:46 am