News Flash

महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-दिविज यांना विजेतेपद

दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या अव्वल मानांकित बोपण्णा-दिविज जोडीने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली.

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा

भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीने पुरुष दुहेरीत ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज आणि जॉनी ओमारा या जोडीचा ६-३, ६-४ असा सहज पराभव करत एमएसएलटीएतर्फे आयोजित टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या अव्वल मानांकित बोपण्णा-दिविज जोडीने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. १ तास ३ मिनिटे रंगलेल्या या एकतर्फी लढतीत बोपण्णा-दिविज जोडीने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकून विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली.

दुसऱ्या सेटमध्येही बोपण्णा-दिविज जोडीने आपले वर्चस्व कायम राखले. प्रारंभीच्या २-२ अशा बरोबरीनंतर बोपण्णा-दिविज जोडीने ४-२ अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर बांब्रिज-ओमारा यांनी सामन्यात पुनरागमन करून ४-४ अशी बरोबरी साधली. अखेर पुन्हा एकदा प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस मोडीत काढत बोपण्णा-दिविज जोडीने ६-४ अशा फरकासह विजेतेपदावर नाव कोरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 1:43 am

Web Title: bopanna divij won the title
Next Stories
1 नोवाक जोकोविचला  पराभवाचा धक्का
2 आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा : भारताची सलामी थायलंडशी
3 Pro Kabaddi Season 6 Final : बंगळुरु बु्ल्सची गुजरातवर मात, पवन शेरावत चमकला
Just Now!
X