04 March 2021

News Flash

Video : याला म्हणतात नशीब ! स्विंग झालेल्या चेंडूवर त्रिफळाचीत होऊनही उथप्पा नाबाद

केरळ विरुद्ध हैदराबाद सामन्यात घडला प्रकार

क्रिकेटमध्ये नशीब कधी कोणाची साथ देईल हे सांगता येत नाही. केरळ विरुद्ध हैदराबाद रणजी सामन्यात असाच एक भन्नाट प्रकार पहायला मिळाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना केरळचा संघ १६४ धावांवर गारद झाला. टीम इंडियातून सध्या बाहेर असलेला फलंदाज रॉबिन उथप्पा सध्या केरळकडून खेळतो आहे. हैदराबादचा गोलंदाज रवी तेजाने टाकलेला चेंडू भन्नाट स्विंग होत स्टम्पवर जाऊन आदळला, मात्र असं असूनही उथप्पा नाबादच राहिला.

पहिल्या डावात १२ व्या षटकादरम्यान रवी तेजाने टाकलेल्या चेंडूवर उथप्पा पूर्णपणे चुकला. चेंडू स्टम्पला लागल्यामुळे हैदराबादचा संघ जल्लोष करणार इतक्यातच पंचांनी तो चेंडू नो-बॉल असल्याची घोषणा केली. पाहा हा व्हिडीओ…

मात्र आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा फायदा उथप्पाला घेता आलेला नाही. ९ धावांवर रवी तेजानेच उथप्पाला झेलबाद करत माघारी धाडलं. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांना नेटाने सामना केल्यामुळे केरळने १६४ धावांपर्यंत मजल मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 2:44 pm

Web Title: bowled but not out watch how robin uthappa escape beautiful ball by ravi teja despite getting bowled out psd 91
Next Stories
1 पृथ्वी शॉमागे दुखापतीचं ग्रहण, न्यूझीलंड दौऱ्याबद्दल साशंकता
2 हार्दिक-नताशाच्या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्याची वादग्रस्त कमेंट
3 हार्दिकनंतर आता ‘या’ खेळाडूचा नंबर? प्रेयसीसोबतच्या फोटोनंतर चर्चांना उधाण
Just Now!
X