News Flash

अनिर्णित सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांचेच वर्चस्व

विजयासाठी ४११ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना श्रीलंकेच्या अध्यक्षीय संघाने दुसऱ्या डावात ६ बाद २०० धावा करीत सामना अनिर्णित ठेवला. मात्र या सामन्यात भारतीय गोलंदाजांनीच वर्चस्व

| August 9, 2015 12:10 pm

विजयासाठी ४११ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना श्रीलंकेच्या अध्यक्षीय संघाने दुसऱ्या डावात ६ बाद २०० धावा करीत सामना अनिर्णित ठेवला. मात्र या सामन्यात भारतीय गोलंदाजांनीच वर्चस्व गाजविले.
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय गोलंदाजांना या सामन्याद्वारे भरपूर सरावाची संधी मिळाली. ऑफस्पीनर रवीचंद्रन अश्विनने ८ षटकांत ३८ धावांमध्ये तीन बळी घेत प्रभावी कामगिरी केली. हरभजनसिंग (१/२६) व अमित मिश्रा (१/४२) या फिरकी गोलंदाजांनीही अध्यक्षीय संघाच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले.
भारताने ३ बाद ११२ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. मात्र त्यांनी के. एल. राहुल (नाबाद ४७) व चेतेश्वर पुजारा (नाबाद ३१) या शुक्रवारच्या जोडीने निवृत्त होत अन्य फलंदाजांना सरावाची संधी दिली. मात्र भारताच्या अश्विन (०), हरभजन (४), मिश्रा (७) यांनी निराशा केली. भुवनेश्वर कुमारने पाच चौकारांसह ३७ धावा करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने उमेश यादव (नाबाद १७) याच्या साथीत शेवटच्या विकेटसाठी ३७ धावांची भर घातली. त्यामुळेच भारताला दीडशे धावांपलीकडे पोहोचता आले.
अध्यक्षीय संघापुढे ४११ धावांचे अशक्य आव्हान होते. सलामीवीर कौशल सिल्वा याने आत्मविश्वासाने खेळ करीत नाबाद ८३ धावा केल्या. त्याच्या संयमपूर्ण खेळीत सहा चौकारांचा समावेश होता. त्याने उपल थरंगाच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. थरंगा याने शैलीदार खेळ करीत ५२ धावा केल्या. सिल्वा याने सचित पथिराणा (नाबाद २५) याच्याबरोबर सातव्या विकेटसाठी ४६ धावांची अखंडित भागीदारी केली. मात्र अध्यक्षीय संघाच्या डावावर भारतीय गोलंदाजांनीच अंकुश ठेवला होता.
संक्षिप्त धावफलक
भारत : ३५१ व १८० (के. राहुल निवृत्त ४७, चेतेश्वर पुजारा निवृत्त ३१, भुवनेश्वर कुमार ३७, विश्वा फर्नान्डो २/१७, कासुन रजिता २/३८) अनिर्णित विरुद्ध श्रीलंका : अध्यक्षीय संघ १२१ व ६ बाद २०० (कौशल सिल्वा नाबाद ८३, उपुल थरंगा ५२, सचित पथिराणा नाबाद २५, रवीचंद्रन अश्विन ३/३८)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2015 12:10 pm

Web Title: bowlers impress as indians dominate in drawn tour match
टॅग : India Vs Sri Lanka
Next Stories
1 भारत ‘अ’ दक्षिण आफ्रिका ‘अ’ आमनेसामने
2 फेल्प्सकडून ऑलिम्पिकसाठी आशा उंचावल्या
3 असमानतेची अखिलाडूवृत्ती
Just Now!
X