लॉकडाउनपश्चात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. २७ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिकेला सुरुवात होणार असून दोन्ही संघ या दौऱ्यात ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहेत. भारताचा माजी गोलंदाज झहीर खानच्या मते गोलंदाज या दौऱ्याचं भवितव्य ठरवतील.

अवश्य वाचा – Ind vs Aus : चाहत्यांमध्ये मालिकेची उत्सुकता, दोन वन-डे आणि टी-२० मालिकेची तिकीटं संपली

“ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडू नेहमी उसळी घेतो. त्यामुळे वन-डे असो टी-२० किंवा कसोटी मालिका गोलंदाज या दौऱ्याचं भवितव्य ठरवतील असं मला वाटतं. गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येवर रोखतात यावर सर्व निकाल ठरेल. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये फॉर्मात असलेले सगळे सर्वोत्तम गोलंदाज या दौऱ्यात खेळत आहेत.” झहीर खान पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

यंदा स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियन संघात परतल्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज यंदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरु शकतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.