News Flash

केवळ ११ सामने, मानधन २६५९ कोटी .. हा आहे क्रीडाविश्वातील सर्वात महागडा खेळाडू

DAZN या कंपनीबरोबर केलेल्या कराराबद्दल त्याने नुकताच केला खुलासा

खेळ आणि पैसा हे समीकरण कोणासाठीही नवीन नाही. विविध खेळ आणि त्यासाठी मिळणारे मानधन हे दिवसेंदिवस वाढत जात आहे. आयपीएल किंवा तत्सम फ्रँचाइजी पद्धतीवर आधारित स्पर्धा हे याचे उत्तम उदाहरण आहेत. भारतातील आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत स्पर्धा मानली जाते. याशिवाय फुटबॉल या खेळातील खेळाडूही मालामाल होताना दिसतात. पण नुकतेच या साऱ्या खेळांना आणि खेळाडूंना मागे टाकत एका खेळाडूने क्रीडा विश्वाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला आहे.

आतापर्यंत बरेच मोठे करार नामवंत खेळाडूने केले आहेत. पण हा करार मात्र ऐतिहासिक असल्याचे म्हटले जात आहे. याचे कारण म्हणजे या कराराची किंमत. एका बॉक्सरशी तब्बल २६५९ कोटी रुपयांचा एका करार करण्यात आला आहे.

साऊल कॅनेलो अलव्हारेझ

 

बॉक्सरचे नाव साऊल कॅनेलो अलव्हारेझने असून तो मॅक्सिकोचा खेळाडू आहे. या कराराबद्दल त्याने नुकताच खुलासा केला आहे. DAZN कंपनीबरोबर त्याने एक करार केला असून यासाठी त्याला २६५९ कोटी म्हणजेच सुमारे ३६५ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मिळणार आहे.य करारांतर्गत अल्वारेझ ११ लढती खेळणार आहे. १५ डिसेंबरपासून या लढती सुरु होणार आहेत.

यापूर्वी सर्वाधिक रक्कमेचा करार हा २०१४ साली झाला होता. अमेरिकेचा बेसबॉलपटू गिआनकार्लो स्टॅन्टोनने ३२५ मिलियन डॉलरचा हा करार केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 5:28 pm

Web Title: boxer canelo alvarez signs richest contract in sport history of worth rs 2659 crores
टॅग : Boxing
Next Stories
1 ‘नो बॉल न टाकलेला माणूस’, ऑस्ट्रेलियाच्या नेथन लॉयनचा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम
2 कांगारुंवर मात करत पाकिस्तानची दुसऱ्या कसोटीत बाजी; मालिकाही टाकली खिशात
3 विदेश दौऱ्यावर पत्नी- प्रेयसीला नेण्याबाबत कोणताही निर्णय नाही – BCCI
Just Now!
X