News Flash

अर्जुन पुरस्काराबाबत मनोज क्रीडामंत्र्यांना भेटणार

‘अर्जुन’ पुरस्कारासाठी आपल्या नावाची शिफारस न झाल्यामुळे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता बॉक्सर मनोजकुमार याने केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्रसिंग यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडायचे ठरविले आहे.

| August 17, 2013 04:48 am

‘अर्जुन’ पुरस्कारासाठी आपल्या नावाची शिफारस न झाल्यामुळे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता बॉक्सर मनोजकुमार याने केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्रसिंग यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडायचे ठरविले आहे. बिलियर्ड्स विश्वविजेते मायकेल फरेरा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पुरस्कार निवड समितीने बॉक्सिंगकरिता फक्त कविता चहाल हिची शिफारस केली आहे. मनोजने जागतिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली होती. त्याने दोन वेळा आशियाई स्पर्धेत कांस्यपदकही मिळविले आहे.
या पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक मिळवूनही आपल्याला अर्जुन पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळेच मी आता जितेंद्रसिंग यांची भेट घेऊन माझी बाजू मांडणार आहे, असे मनोजकुमारने सांगितले.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2013 4:48 am

Web Title: boxer manoj kumar seeks appointment with sports minister after arjuna snub
Next Stories
1 खेळाडूंनी नियमावलींचे कठोर पालन करावे – इसिनबायेव्हा
2 जागतिक चषक बुद्धिबळ स्पर्धा: अधीबनची तिसऱया फेरीत धडक!
3 व्हिडिओ: ‘पोलार्ड’ने घेतलेला एक अनोखा ‘रन-आउट’
Just Now!
X