अमित आणि शिवाला रौप्यपदके

दुबई : आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सोमवारी संजीतने  भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले. अमित पांघल आणि  शिवा थापा यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

रविवारी महिलांनी चारपैकी फक्त सुवर्णपदक कमावल्यानंतर सोमवारी पुरुषांकडून सुवर्ण लयलूटीची अपेक्षा केली जात होती. परंतु पुरुषांच्या आव्हानाची सुरुवात खराब झाली. पण उत्तरार्धात ९१ किलो वजनी गटात संजीतने पाच वेळा आशियाई अजिंक्यपद विजेत्या आणि रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या व्हॅसिली लेव्हिलचा ४-१ असा पराभव केला.

५२ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या शाखोबिदिन झॉयरोव्हने जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या अमितवर असा निसटता विजय मिळवला. अमितच्या निकालाबाबत भारतीय संघाने लवादाकडे दाद मागितली होती. मात्र ती फेटाळण्यात आली.

६४ किलो गटाच्या अंतिम सामन्यात मोंगोलियाच्या आशियाई रौप्यपदक विजेत्या बतारसुख शिंझॉरिगने ३-२ असे विभाजीत निकालाआधारे नामोहरम केले.

एकूण पदके १५

पदके   सुवर्ण   रौप्य   कांस्य     एकूण

पुरुष      १      २           २             ५

महिला  १       ३         ६              १०