मेलबर्न येथे सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्यानंतर उमेश यादवही दुखापतग्रस्त झाला आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना उमेश यादवला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. त्यामुळे सामना अर्ध्यात सोडून उमेश यादवनं मैदान सोडलं.

दुसऱ्या डावातील आठवं षटक टाकत असताना उमेश यादावला हॅमस्ट्रिंगमुळे मैदान सोडवं लागलं. उमेश यादवचं उर्वरीत षटक मोहम्मद सिराजनं पूर्ण केलं. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना उमेश यादव चांगलाच लयीत दिसत होता. सलामीवीर फलंदाज जो बर्नला बाद करत यादवनं भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. लयीत दिसणारा उमेश यादवला गोलंदाजी करत असतानाच अचानक हॅमस्ट्रिंगचा त्रास होऊ लागला.

Video : बुम बुम बुमराह; क्लीन बोल्ड झाला पण स्मिथला कळलंच नाही

आणखी वाचा- रहाणेचा मास्टरस्ट्रोक; राहुलऐवजी जाडेजाला खेळवण्याचा डावपेच यशस्वी

उमेश यादवची दुखपत कितपत गंभीर आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण इशांत शर्मा आणि शमी यांच्यानंतर उमेश यादवही दुखपतग्रस्त झाला आहे. सध्या सर्व गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे.

आणखी वाचा- अर्धशतकी खेळीत रविंद्र जाडेजा चमकला, कपिल देव यांच्याशी बरोबरी

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं रविंद्र जाडेजाच्या रुपानं अतिरिक्त गोलंदाज खेळवल्याचा फायदा या सामन्यात होईल. यादवच्या अनुपस्थितीत जाडेजा-अश्विन काही षटकं टाकतील. दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाची पकड आहे. बॉर्डर गावसकर चषकात भारतीय संघ १-० ने पिछाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करत आहे.