News Flash

सुनिल गावसकर म्हणतात; मी अजिंक्यचं कौतुक करणार नाही, कारण…

विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य भारताचा कर्णधार

फोटो सौजन्य - AP

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी आश्वासक सुरुवात केली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १९५ धावांत गुंडाळल्यानंतर दिवसाअखेरीस भारताने मयांक अग्रवालच्या मोबदल्यात १ बाद ३६ पर्यंत मजल मारली. कर्णधार अजिंक्य रहाणेने या सामन्यात आपल्या नेतृत्वकौशल्यची झलक दाखवत गोलंदाजीत बदल, फिल्डींग प्लेसमेंट करत कांगारुंना वरचढ व्हायची एकही संधी दिली नाही.

अजिंक्यच्या या आश्वासक नेतृत्वानंतरही माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी आपण अजिंक्यचं कौतुक करणार नसल्याचं म्हटलं आहे. “सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लगेच निष्कर्षापर्यंत पोहचण्याची घाई करायला नको. आता मी अजिंक्यचं कौतुक करून तो खूप चांगला कर्णधार आहे असं म्हटलं तर लगेच माझ्यावर मी मुंबईच्या खेळाडूंना पाठींबा देतो असा आरोप होईल. त्यामुळे सध्यातरी मला या गोष्टींमध्ये अडकायचं नाहीये.” गावसकर सामना संपल्यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळाचं विश्लेषण करताना बोलत होते.

अवश्य वाचा – पराभूत संघासोबत फोटोसेशन ते सिराजचा सन्मान, रहाणेची नेतृत्वशैली ठरतेय चर्चेचा विषय

दरम्यान १९५ धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल पहिल्याच षटकात स्टार्कच्या गोलंदाजीवर एकही धाव न काढता माघारी परतला. पहिल्याच षटकात बसलेल्या या फटक्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली. परंतू शुबमन गिलनेही काही सुरेख फटके खेळत संघावरचं दडपण कमी केलं. ३८ चेंडूत २८ धावांच्या खेळीत गिलने ५ चौकार लगावले. दुसऱ्या बाजूने पुजारानेही त्याला उत्तम साथ दिली. अखेरच्या सत्रांत फारशी जोखीम न स्विकारता भारतीय फलंदाजांनी षटकं खेळून काढत १ बाद ३६ वर पहिल्या दिवसाचा खेळ संपवला.

अवश्य वाचा – आऊट की नॉट आऊट?? तिसऱ्या पंचांची टीम पेनवर मेहरनजर, माजी खेळाडूंकडून आश्चर्य व्यक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 3:17 pm

Web Title: boxing day test i will be accused of backing a mumbai boy sunil gavaskar on ajinkya rahanes captaincy psd 91
Next Stories
1 पराभूत संघासोबत फोटोसेशन ते सिराजचा सन्मान, रहाणेची नेतृत्वशैली ठरतेय चर्चेचा विषय
2 आऊट हो जा…न्यूझीलंड फलंदाजाच्या चिवट खेळीला कंटाळला पाकिस्तानी गोलंदाज
3 मयांकसोबत पहिल्यांदाच झालं असं काही की….