News Flash

निवडणुकींचे नियम बदलल्याचा आरोप

बॉक्सिंग या खेळावर सध्या नियंत्रण असलेल्या बॉक्सिंग इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनीच निवडणुकीच्या नियमांमध्ये आपल्याला अनुकूल बदल केल्याचा आरोप काही संघटकांनी केला आहे.

| September 4, 2014 05:24 am

बॉक्सिंग या खेळावर सध्या नियंत्रण असलेल्या बॉक्सिंग इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनीच निवडणुकीच्या नियमांमध्ये आपल्याला अनुकूल बदल केल्याचा आरोप काही संघटकांनी केला आहे. नागालँड हौशी बॉक्सिंग संघटनेचे सरचिटणीस टी. मेरेन पॉल यांनी बॉक्सिंग इंडियाला पत्र लिहून काही नियमांबाबत आक्षेप घेतला आहे. याआधी महासचिवपदासाठी रिंगणात असलेल्या राकेश ठाकरन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी जय कवळी यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला होता. हरयाणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाकरन यांनी कवळी यांच्या अर्जात अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचा आरोप केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 5:24 am

Web Title: boxing india faces allegations of manipulating election rules
टॅग : Boxing India
Next Stories
1 धोनीकडून भारतीय संघाचे कौतुक
2 मुस्लिम धर्म स्वीकार, स्वर्ग मिळेल! पाक क्रिकेटपटूचा श्रीलंकेच्या दिलशानला सल्ला
3 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविच, सेरेना उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X