दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए बी डीव्हिलियर्स याने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती स्वीकारली. पण तसे असले तरीही इतर स्पर्धांमध्ये तो खेळत आहे. आजही तो मैदानात उतरला की त्याच्या फटकेबाजीने प्रेक्षक वेडा होऊन जातो. याचाच प्रत्यय डीव्हिलियर्सने पुन्हा एकदा दिला आहे. बांगलादेश प्रिमिअर लीग टी२० स्पर्धेत डीव्हिलियर्स खेळत असताना त्याने रंगपूर रायडर्सकडून तुफानी शकत ठोकले.

मंगळवारी BPL स्पर्धेत रंगपूर रायडर्स आणि ढाका डायनामाईट्स या संघात सामना होता. या सामन्यात डीव्हिलियर्सने दमदार शतक ठोकले. ५० चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने त्याने नाबाद १०० धावा लगावल्या. टी२० क्रिकेटमधील हे त्याचे चौथे शतक ठरले.

डीव्हिलियर्स आणि अलेक्स हेल्स यांच्यात १८४ धावांची भागीदारी झाली. BPL 2019 मधील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. हेल्सनेही ५३ चेंडूत नाबाद ८५ धावा चोपल्या. या दोघांच्या विक्रमी भागीदारीमुळे ढाका डायनामाईट्सने विजयासाठी दिलेले १८५ धावांचे लक्ष्य रंगपूर रायडर्सने फक्त १८ व्या षटकात गाठले.