ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदीची शिक्षा भोगत आहे. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्याप्रकरणी त्याच्यावर एका वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे सध्या तो बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत आपला झंझावाती खेळ दाखवत आहे. आपल्या स्फोटक खेळीसाठी आणि उत्तुंग फटकेबाजीसाठी तो कायमच चर्चेत असतो. पण तो आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याने केलेली Right-handed फलंदाजी..

रंगपूर रायडर्स या संघाविरुद्ध सिल्हेट सिक्सर्क्स संघाचा सामना सुरु होता. सिल्हेट सिक्सर्स संघाची फलंदाजी सुरु असताना डेव्हिड वॉर्नरने ही कमाल केली. १९ व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूत गेलच्या गोलंदाजीवर वॉर्नरला केवळ २ धावाच घेता आल्या. त्यामुळे त्रासलेल्या वॉर्नरने शक्कल लढवली आणि उजव्या बाजूने फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्या गोष्टीचा त्याला फायदा झाला. षटकाच्या उर्वरित ३ चेंडूवर वॉर्नरने अनुक्रमे षटकार आणि दोन चौकार लगावले.

त्याच्या या खेळीवर नेटकरीदेखील फिदा झाले होते.

वॉर्नरने या खेळीच्या जोरावर ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३६ चेंडूत ६१ धावा केल्या आणि आपल्या संघाला १८७ धावांपर्यंत मजल मारून दिली.