सिडनीमध्ये २९ ऑक्टोबरला महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या फाउंडेशनतर्फे होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात सन्मानार्थी म्हणून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ब्रॅडमन यांच्या ९०व्या वाढदिवशी त्यांच्या अ‍ॅडलेडमधील निवासस्थानी सचिनला त्यांची भेट घेण्याची संधी मिळाली होती. सचिन खेळत असताना त्याच्यात माझी प्रतिमा दिसते, असे गौरवोद्गार त्यावेळी ब्रॅडमन यांनी काढले होते. त्यानंतर ब्रॅडमन यांच्या सार्वकालीन संघात सचिनला स्थान देण्यात आले होते.