News Flash

नेयमार, सिल्व्हा यांचा ब्राझील संघात समावेश

आगामी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेसाठी अनुभवी आक्रमणपटू नेयमार आणि बचावपटू थियागो सिल्व्हा यांचा ब्राझील संघात समावेश करण्यात आला आहे.

साव पावलो : आगामी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेसाठी अनुभवी आक्रमणपटू नेयमार आणि बचावपटू थियागो सिल्व्हा यांचा ब्राझील संघात समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेचे यजमानपद भुषवणाऱ्या ब्राझीलची ‘ब’ गटात पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वाडोर या संघांशी गाठ पडणार आहे. नेयमार कोपा अमेरिका किंवा टोक्यो ऑलिम्पिक यांपैकी एकाच स्पर्धेत खेळण्याची शक्यता होती. त्यामुळे आता ऑलिम्पिकबाबत तो काय निर्णय घेतो, हे पाहणे रंजक ठरेल. नेयमारव्यतिरिक्त गॅब्रिएल जिजस, व्हिनिशियस ज्युनियर, कॅसेमिरो यांच्या समावेशामुळे ब्राझीलची बाजू भक्कम झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:00 am

Web Title: brazil football cofa america football neymar silva ssh 93
Next Stories
1 माजी आशियाई सुवर्णपदक विजेता बॉक्सिंगपटू डिंको सिंगचे निधन
2 कठोर कारवाईप्रकरणी वॉनची ‘ईसीबी’वर टीका
3 न्यूझीलंडचा वेगवान मारा भारतासाठी आव्हानात्मक!
Just Now!
X