ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिनो याला करोनाची लागण झाल्याचे त्याने सांगितले. ४० वर्षीय रोनाल्डिनोने करोनाची चाचणी केली होती. त्या चाचणीचा रविवारी निकाल पॉझिटिव्ह आला. रोनाल्डिनोने स्वत: इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. करोना लागण झाल्याची समजल्यावर त्याने स्वत:ला विलगीकरणात ठेवलं असून करोनाची कोणतीही लक्षणं नसल्याचेही त्याने स्पष्ट केलं. तसेच करोनामुक्त होईपर्यंत तो हॉटेल रूमच्या बाहेर पडणार नसल्याचंही त्याने सांगितलं.

रोनाल्डिनो सध्या बेलो होरिझोन्टे शहरात आहे. तिथे तो एका स्पर्धेत अटलेटिको मिनेरो या स्थानिक संघाकडून सहभागी झाला आहे. तिथेच त्याने करोनाची चाचणी करून घेतली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. “मी बेलो होरिझोन्टेमध्ये काल दाखल झालो. त्यानंतर माझी करोना चाचणी झाली, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मला करोनाची कोणतीही लक्षणं नसून मी तंदुरूस्त आहे”, अशी माहिती त्याने दिली.

 

View this post on Instagram

 

De olho nela pro domínio

A post shared by Ronaldo de Assis Moreira (@ronaldinho) on

गेल्या वर्षभराचा काळ रोनाल्डिनोसाठी खूपच कसोटीचा होता. पॅराग्वेमध्ये त्याला बनावट पोसपोर्ट प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला ५ महिने नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. बनावट पोसपोर्ट बाळगत परदेशात प्रवेश केल्याने त्याला त्याचा भाऊ आणि मॅनेजर यांच्यासोबत शिक्षा भोगावी लागली होती.