News Flash

कोपा अमेरिकाच्या आयोजनाला ब्राझिलच्या न्यायालयाची परवानगी

कोलंबिया आणि अर्जेटिनाने अखेरच्या क्षणी ही स्पर्धा आयोजित करण्यास नकार दिला होता.

ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रतिष्ठेच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाला हिरवा कंदील दाखवला आहे

साव पावलो : करोनाची भीती असतानाही ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रतिष्ठेच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाला हिरवा कंदील दाखवला आहे.

११ न्यायाधीशांनी एकमताने हा निर्णय घेतल्यामुळे ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो आणि संयोजकांना दिलासा मिळाला आहे. कोलंबिया आणि अर्जेटिनाने अखेरच्या क्षणी ही स्पर्धा आयोजित करण्यास नकार दिला होता.

ही स्पर्धा आयोजित करू नये, याबाबत ब्राझिलच्या समाजवादी पक्षाने तसेच धातू कामगारांच्या संघटनेने केलेल्या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. ही स्पर्धा आयोजित केली जाऊ नये, याबाबत मतप्रदर्शन करण्याचा तसेच प्रतिबंध घालण्याचा अधिकार फक्त राज्य प्रशासनाला आहे, असे मत न्यायाधीश कार्मेन ल्युसिया यांनी न्यायालयात मांडले. त्याला अन्य १० न्यायाधीशांनी पाठिंबा दिला.

‘‘राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तसेच विद्यमान कायद्यांच्या आधारे सर्वोच्च न्यायालय काम करत असते. न्यायाधीशांच्या इच्छेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज होत नसते,’’ असे ल्युसिया यांनी सांगितले. कोपा अमेरिका स्पर्धेला रविवारपासून सुरुवात होत असून सलामीची लढत यजमान ब्राझिल आणि व्हेनेझुएला यांच्यात ब्राझिलिया येथे रंगणार आहे. अंतिम सामना रिओ दी जानिरो येथील मॅराकाना स्टेडियमवर १० जुलै रोजी होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 12:13 am

Web Title: brazil supreme court allows copa america to go ahead despite covid zws 70
Next Stories
1 पोलंड खुली कुस्ती स्पर्धा : विनेश अंतिम फेरीत दाखल
2 टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा : ऑलिम्पिकसाठी शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय
3 Euro cup 2020: रशियाचा फुटबॉलपटू मोस्तोवोय याला करोनाची लागण झाल्याने स्पर्धेतून बाहेर
Just Now!
X