26 February 2021

News Flash

ब्राझीलचा कोस्टा रिकावर विजय

पाच बचावपटू मैदानात उतरवूनही कोस्टा रिकाला ब्राझीलचे आक्रमण थोपविण्यात अपयश आले.

पाच वेळा विश्वविजेत्याचा मान पटकावणाऱ्या ब्राझीलने विश्वचषक पात्रता स्पध्रेच्या पूर्वतयारीसाठी खेळविण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत कोस्टा रिकावर १-० असा विजय साजरा केला. दहाव्या मिनिटाला हल्कने केलेला गोल ब्राझीलच्या विजयासाठी पुरेसा ठरला. पाच बचावपटू मैदानात उतरवूनही कोस्टा रिकाला ब्राझीलचे आक्रमण थोपविण्यात अपयश आले.
‘‘सराव शिबिरात घेतलेल्या मेहनतीचा फायदा झाला आणि याहून अधिक चांगली कामगिरी संघ करू शकतो. हा संघ पुढे कशी कामगिरी करतो, हे पाहायला आवडेल. गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण करूनही एकच गोल करता आला, याची खंत वाटते,’’ अशी प्रतिक्रिया ब्राझीलचे व्यवस्थापक कार्लोस डुंगा यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 3:07 am

Web Title: brazils victory over costa rica
Next Stories
1 शेन वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
2 बीसीसीआयची मनधरणी करणे थांबवा – मियाँदाद
3 युवा बॉक्सिंगपटूंनी आशा उंचावल्या! , आठवडय़ाची मुलाखत ‘जय कवळी’
Just Now!
X