बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या घरात काम करणाऱ्या एका नोकराने पोलिसांना याबाबत माहिती दिल्याचे सांगितले गेले. सुशांत सिंग राजपूत हा ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता.

सुशांतच्या मृत्यूवर धोनीच्या CSK ची पहिली प्रतिक्रिया

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा आणि मनोरंजन विश्वातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. सुशांतच्या छिछोरे या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची विशेष चर्चा रंगली. चित्रपटात त्याने, ‘आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर तोडगा नसतो. आपण त्या परिस्थितीचा सामना केला पाहिजे आणि जगत राहिले पाहिजे’, असा संदेश दिला होता. पण दुर्दैवाने सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली, असं म्हटलं जात आहे. सुशांतच्या आत्महत्येचा पाकिस्तानच्या क्रिकेटपटूलाही धक्का बसला.

‘बॉलिवूडच्या धोनी’चा अनपेक्षित ‘फिनिश’; क्रीडाविश्वातून श्रद्धांजली

“सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. जीवन हे खरं तर (क्रिकेटच्या एका) खूप चांगल्या डावासारखे आहे. ३४ हे काही जाण्याचे वय नाही. सुशांत, खूप लवकर गेलास. ईश्वर तुझ्या मृतात्म्यास शांती देवो”, असे ट्विट पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने केले.

आता तरी मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या; सुशांतच्या मृत्यूने लक्ष्मण हळहळला…

मानसिक स्वास्थ्य हा खूप गंभीर विषय आहे. आपण त्याकडे जितकं लक्ष देतो, त्यापेक्षा अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आता तरी त्याकडे लक्ष द्या. संवेदनशील, सरळसाधं आणि सतत इतरांच्या मदतीला धावणे हे सध्याच्या जगात खूप महत्त्वाचे आहे. सुशांतच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे ट्विट करत भारताचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणनेही हळहळ व्यक्त केली होती.

सुशांतने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली. धोनीच्या खेळीपासून ते धोनीच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सवयीपर्यंत सुशांतने धोनीचा खूप चांगल्या पद्धतीने अभिनय केला. त्याच्या या अभिनयाची साऱ्यांनीच वाहवा केली. स्वत: धोनीनेदेखील त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता. मोठ्या पडद्यावर स्वत:लाच बघताना मला खूप मजा आली अशा शब्दात धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.