01 October 2020

News Flash

T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच!

२०२१मधील महिला वन डे विश्वचषक मात्र पुढे ढकलला...

T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत २०२१ आणि २०२२च्या टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२१चा टी-२० विश्वचषक भारतातच होणार असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त टाईम्सनाऊने दिले आहे. याशिवाय २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.

महिलांचा २०२१ एकदिवसीय विश्वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन टी-२० विश्वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०मध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२१च्या यजमानपदासाठी आग्रही होते. त्यामुळे भारताला २०२१ऐवजी २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते असे बोलले जात होते. पण अखेर २०२१च्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.

वन डे विश्वचषकांबद्दलदेखील या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. २०२१चा महिला वन डे विश्वचषक आता ६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२२मध्ये न्यूझीलंडला आयोजित केला जाणार आहे. तर २०२३मध्ये होणारा पुरूषांचा एकदिवसीय विश्वचषक पूर्वनियोजित योजनेनुसार भारतात होणार आहे. २०११च्या विश्वचषकाचे यजमान भारताबरोबरच श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याकडेही होते, पण २०२३चा विश्वचषक पूर्णपणे भारतात खेळवला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 7:42 pm

Web Title: breaking news cricket india confirmed hosts for 2021 t20 world cup as australia hosting 2022 event vjb 91
Next Stories
1 भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह
2 IPL 2020 : विराटसोबत खेळण्याबाबत फिंच म्हणतो…
3 …म्हणून ३७व्या वर्षीही हा खेळाडू खेळतोय क्रिकेट
Just Now!
X