बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या घरात काम करणाऱ्या एका नोकराने पोलिसांना याबाबत माहिती दिल्याचे सांगितले गेले. सुशांत सिंग राजपूत हा ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता.

सुशांतने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली. धोनीच्या खेळीपासून ते धोनीच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सवयीपर्यंत सुशांतने धोनीचा खूप चांगल्या पद्धतीने अभिनय केला. त्याच्या या अभिनयाची साऱ्यांनीच वाहवा केली. स्वत: धोनीनेदेखील त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता. मोठ्या पडद्यावर स्वत:लाच बघताना मला खूप मजा आली अशा शब्दात धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. धोनीकडे नेतृत्व असलेल्या CSK संघाच्या ट्विटर अकाऊंटवर सुशांतला श्रद्धांजली वाहिली. पण धोनीकडून कोणतीही प्रतिक्रिया रविवारच्या दिवसात आली नव्हती. अखेर सोमवरच्या दिवसात धोनीचे मॅनेजर अरूण पांडे यांनी सुशांतच्या मृत्यूनंतरच्या धोनीच्या भावना सांगितल्या.

Kangana Ranaut Buys Mercedes
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

“सुशांतच्या मृत्यूच्या घटनेवर अजूनही विश्वास बसत नाही. शोक कसा व्यक्त करावा हेच मला कळत नाहीये. ही घटना खूपच नाट्यमय आहे. सुशांत केवळ ३४ वर्षांचा होता. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतात, पण त्याच्या पुढ्यात एक उज्ज्वल भविष्य होतं याची मला खात्री होती. सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून माही (धोनी) खूपच खिन्न झाला. त्याच्या मृत्यूचा खूपच धक्का बसला आहे”, अशी माहिती धोनीचे मॅनेजर अरूण पांडे यांनी एबीपी आनंद वाहिनीशी टेलिफोनवरून बोलताना दिली.

“शूटिंगदरम्यान मी सुशांतसोबत १८ महिने होतो. तो त्याच्या कामाप्रति समर्पित होता. जी भूमिका करायची होती, ती त्याने पूर्णपणे आत्मसात केली होती. धोनीची मैदानावरील छोटी-मोठी सवय हुबेहुब वठवण्यासाठी त्याने ९ महिने मैदानात सराव केला होता. तसेच धोनीसोबतही तो १५ दिवस राहिला होता. त्याने धोनीच्या भूमिका खूपच उत्तमरित्या पार पाडली होती. अभिनयासाठी सुशांत घेत असलेल्या मेहनतीवर धोनीसुद्धा खूप खुष होता”, असेही धोनी चित्रपटाते निर्माते अरूण पांडे म्हणाले.